Shodh: Ek Bhayavah Kadambari, Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Novel Books in Marathi , कादंबरी मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best Novel, Bestseller Novels

Shodh: Ek Bhayavah Kadambari, Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Novel Books in Marathi , कादंबरी मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best Novel, Bestseller Novels


Price: ₹245.00
(as of Apr 08, 2024 17:41:22 UTC – Details)



“श्री. जानोरीकर यांस,

आपला एक हितचिंतक या नात्याने मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे. शहरात ‘शिवपार्वती सोसायटी’समोर आपला बंगला आहे. गेली बरीच वर्षे हा बंगला वापरात नाही. माझ्या पाहण्यात आलं आहे की, आपल्या या बंगल्याची मागची आणि पुढची अशी दोन्ही दारं उघडी आहेत.
कॉलनीतली मुलं तिथे आसपास खेळत असतात. खेळ म्हणून किंवा कुतूहल म्हणून मुलं तुमच्या बंगल्यात जाऊन काही नासधूस करण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण प्रत्यक्ष येऊन दारं- खिडक्यांची तपासणी करून सर्व व्यवस्थित बंद करून जावे. आत आपली काही चीजवस्तू असेल तर तीही व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.
एक सावधगिरीची सूचना- पत्रलेखकाचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही; पण माझ्या कानांवर आपल्या या रिकाम्या वास्तूविषयी काही चमत्कारिक गोष्टी आल्या आहेत. स्पष्टच लिहायचं तर या वास्तूत दुष्ट, अभद्र, पापी अशा शक्तींचा वावर आहे. ही वास्तू पछाडलेली आहे. कृपया या सूचनेला योग्य ते महत्त्व द्या. बंगल्याला भेट द्यायला याल ती वेळ भरदिवसाची निवडा. बरोबर कोणीतरी धीराची, समयसूचकता असलेली व्यक्ती असू द्यात. एकट्याने त्या वास्तूत जाण्याचे धाडस करू नका. माझी शंका खोटी ठरली तर सर्वांत जास्त आनंद मलाच होईल; पण सावधगिरी कधीही फुकट जात नाही. कृपया हे ध्यानात ठेवा.

आपला,
एक हितचिंतक.”

From the Publisher

ShodhShodh

“श्री. जानोरीकर यांस,

आपला एक हितचिंतक या नात्याने मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे. शहरात ‘शिवपार्वती सोसायटी’समोर आपला बंगला आहे. गेली बरीच वर्षे हा बंगला वापरात नाही. माझ्या पाहण्यात आलं आहे की, आपल्या या बंगल्याची मागची आणि पुढची अशी दोन्ही दारं उघडी आहेत.

कॉलनीतली मुलं तिथे आसपास खेळत असतात. खेळ म्हणून किंवा कुतूहल म्हणून मुलं तुमच्या बंगल्यात जाऊन काही नासधूस करण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण प्रत्यक्ष येऊन दारं-

खिडक्यांची तपासणी करून सर्व व्यवस्थित बंद करून जावे. आत आपली काही चीजवस्तू असेल तर तीही व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.

एक सावधगिरीची सूचना- पत्रलेखकाचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही; पण माझ्या कानांवर आपल्या या रिकाम्या वास्तूविषयी काही चमत्कारिक गोष्टी आल्या आहेत. स्पष्टच लिहायचं तर या वास्तूत दुष्ट, अभद्र, पापी अशा शक्तींचा वावर आहे. ही वास्तू पछाडलेली आहे. कृपया या सूचनेला योग्य ते महत्त्व द्या. बंगल्याला भेट द्यायला याल ती वेळ भरदिवसाची निवडा. बरोबर

कोणीतरी धीराची, समयसूचकता असलेली व्यक्ती असू द्यात. एकट्याने त्या वास्तूत जाण्याचे धाडस करू नका. माझी शंका खोटी ठरली तर सर्वांत जास्त आनंद मलाच होईल; पण सावधगिरी कधीही फुकट जात नाही. कृपया हे ध्यानात ठेवा.

आपला,

एक हितचिंतक.”

ShodhShodh

तो जमिनीखालून चालला होता. चालला होता याचा अर्थ प्रवास करीत होता. पायांनी

अंतर मागे टाकल्याची संवेदना नव्हती. तो पुढे पुढे जात होता एवढं नक्की. कसा ते काही केल्या उमजत नव्हतं. आसपास-निदान शरीराभोवती-ज्या शरीराचीही काही कल्पना येत नव्हती त्याच्या भोवती-ओली गार माती असावी असं वाटत होतं. मातीचा ओला स्पर्श नव्हता. मातीचा कोणताच वासही नव्हता. त्याला स्पर्शाची, श्वासाची अशी ज्ञानेंद्रियं तरी होती का नाही याचीही काही कल्पना नव्हती. एका दिशेने तो हलत होता ही गोष्ट नक्की. अंधारातला हा प्रवास सहेतूक होता, कोणत्या एका ठराविक दिशेने होत होता की, प्रवाहाबरोबर वाहत चाललेल्या पानासारखा अनैसर्गिक आणि अनियंत्रित होता याचीही काही कल्पना नव्हती. अंधारातला केवळ एक प्रवास. वास्तविक या संपूर्ण असंभाव्य अनुभवात लक्षात राहण्यासारखं काय होतं? पण ते स्वप्न कितीतरी दिवस त्याच्या लक्षात राहिलं, एवढंच नाही, त्या स्वप्नाने तो अतिशय अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनात तर अशी एक चमत्कारिक कल्पना आली की, जमिनीखालून मातीतून सरपटत जाणार्‍या एखाद्या आंधळ्या, निर्बुद्ध अळीच्या अत्यंत मर्यादित अशा आत्मजाणीवेशीच काही क्षण आपण संपर्कात आलो होतो- पण त्याने जेव्हा स्वप्नातला तो अनुभव परत स्मृतीत आणला (जी गोष्ट अत्यंत सोपी होती) तेव्हा त्याला अशी एक अस्वस्थ करणारी जाणीव झाली की त्या अळीच्या (ती खरोखर अळीच असली तर!) मेंदूत, मनात, विचारकेंद्रात, कशातही म्हणा असहायतेची, दुर्बलतेची, कसलीही जाणीव नव्हती. अळीला स्वत:बद्दल काय वाटतं याबद्दलचे हे तर्ककुतर्क म्हणजे जरासा हास्यास्पदच प्रकार वाटायला हवा-पण त्याला तो हास्यास्पद वाटत नव्हता- कारण जेव्हा जेव्हा तो अंधारातला प्रवास आठवणीत आणी तेव्हा तेव्हा त्याला वाटायचं हा प्रवास अळीचा नाही-तर एखाद्या फूट दीडफूट जाडीच्या, उद्दामपणे बेफिकीरपणे स्वत:ला पुढे रेटणार्‍या एखाद्या अजगरासारखा अजस्त्र शरीराचा आहे. शार्क, हत्ती, सिंह, सुसरी, मगरी, हे जसे आपापल्या वर्तुळात बेफिकीरपणे, बिनधास्तपणे वावरतात, तसा तो प्रवास होता. अळी असलीच तर ती अजस्त्र होती. नसेल तिला आसपासच्या परिस्थितीचं ज्ञान-पण तिला कशाची भीतीही नव्हती!

ShodhShodh

देशपांडे पाच-सहा महिन्यांपूर्वीच कामावर रुजू झाली होती. म्हणजे वर्षानुवर्षे नर्स म्हणून काम करणार्‍यांच्या मानाने तशी अगदी नवखीच. जुन्या नर्स आपल्या कामात निर्ढावलेल्या होत्या.

नवशिक्या नर्सेसच्या गळी रात्रपाळी मारण्यात त्या पटाईत होत्या. तेव्हा देशपांडे एकटीच होती आणि नर्स स्टेशनच्या काउंटरपाशी उभी राहून सर्व कॉरिडॉर डोळ्या खालून घालत होती. एकदम एकशेअकरा नंबरच्या खोलीचा लाल दिवा उघडझाप करायला लागला. सवयीने देशपांडे तिकडे निघालीसुद्धा-आणि मग थांबली.

त्या उघडझाप करणार्‍या लाल दिव्याकडे ती पाहतच राहिली. हे कसं शक्य होतं? एकशेअकरा नंबरची खोली चार दिवसांपूर्वीच खाली झाली होती.

आता एकशेअकरा रिकामी होती. किल्ली बोर्डवर लटकत होती.

तरीही लाल दिवा उघडझाप, उघडझाप करीतच होता.

पहावं हे लागणारच होतं. शेवटी तिने बोर्डवरची किल्ली काढून घेतली आणि ती भराभरा एकशेअकरापाशी आली. कुलूप काढून कोयंडा सरकवून तिने दार आत ढकललं. दारातूनच ती आतल्या खोलीकडे पाहत उभी राहिली. अर्थात खोली रिकामी असायला हवी होती. खरं तर होती- का नव्हती? उजवीकडच्या कॉटवर, जिथे पेशंट असायचा, ते मधे काय होतं? तिच्या काळजाने केवढी पलटी खाल्ली! कॉटवर मध्यभागी काहीतरी होतं आणि डोलल्यासारखं ते डावी -उजवीकडे हलत होतंएकाएकी देशपांडेला आठवलं-खिडकीबाहेरचं अशोकाचं झाड. तिला समोरच्या भिंतीतले खिडक्यांचे अर्धप्रकाशित चौकोन दिसत होते-आणि वार्‍यावर हलणारं झाडही दिसत होतं. छातीत रुतलेला श्वास एखाद्या स्फोटासारखा बाहेर पडला. डावीकडे हात करून तिने खोलीतला दिवा लावला. अर्थात खोली रिकामी होती. पेशंटच्या कॉटवर चादर घट्ट दुमडून बसवली होती. वर उशी होती. पायथ्याशी चादरीची चौकोनी घडी होती. खोलीतली दुसरी कॉटही अशीच तयार होती. देशपांडे खिडकीपाशी आली. बाहेर झाड होतं. त्याच्यामागे उंच पोलवर ट्यूब होती; पण तिला काहीतरी खटकत होते. ट्यूब उजव्या बाजूला होती. उजव्या बाजूला म्हणजे झाडाची सावली खोलीत पडली तरी ती डाव्या बाजूस पडणार होती. उजव्या बाजूस नाही. जिथे ती पेशंटची कॉट होती. खिडकीला पाठ लावून देशपांडे उभी होती आणि भयभीत नजरेने खोलीभर पाहत होती. तिला त्या खोलीत क्षणभरही थांबायचं नव्हतं-पण बाहेर जायचं म्हणजे- म्हणजे‘त्या’ कॉटजवळून जावं लागणार-ज्या कॉटवर-ज्या कॉटवर-

तिने एकदम निर्णय घेतला आणि धावत धावत ती खोलीबाहेर आली. खोलीतला दिवासुद्धा बंद करायला ती थांबली नाही. बाहेर आल्या आल्या आपल्यामागे दार बंद करून, कोयंडा सारून, कुलूप लावलं तेव्हाच तिला जरा हायसं वाटलं. सावकाश सावकाश ती नर्स स्टेशनकडे आली. येताना दोन-तीनदा तरी तिने खांद्यावरून मागे वळून पाहिलं.

नर्स स्टेशनमध्ये येऊन ती स्टुलावर टेकते ना टेकते तोच मागच्या बोर्डवरचा एक लाल दिवा उघडझाप करायला लागला. तिने वळून बोर्डकडे पाहिले.

खोली नंबर एकशे एक. खोली नंबर एकशे एक. पण एकशे एकची किल्ली तिथेच हुकला लटकत होती. खोली नंबर एकशे एक दोनच दिवसांपूर्वी खाली झाली होती. खोली नंबर एकशेएक रिकामी होती. पण एकशेएकचा लाल दिवा उघडझाप करीत होता.

त्या रिकाम्या खोलीत जायची तिची हिंमतच होत नव्हती. काउंटरवर डोकं टेकवून देशपांडे मुसमुसून रडायला लागली.

मरिया आली तेव्हा तिला देशपांडे ही अशी दिसली.

‘अगं! देशपांडे! अगं! हे काय?’ मरिया जवळ येत म्हणाली. देशपांडेने एकदा मान वर करून मरियाकडे पाहिलं आणि तिला मिठीच मारली.

अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते.

धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणार्या

धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही.

कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणार्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणार्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

– हृषीकेश गुप्ते

Narayan DharapNarayan Dharap

नारायण धारप

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (22 April 2023); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 312 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203941
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203949
Item Weight ‏ : ‎ 330 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Scroll to Top