Prabhavi Vakta, Prabhavi Vyakti: Improve Public Speaking For Success – Del Carnegie Books in Marathi (dell karnegi) : डेल कार्नेगी मराठी प्रेरणादायी अनुवादीत बुक्स, कारनेगी Translated Book, Talk To Anyone, Bestseller Book Communication Skills by पुस्तक How To

Price: ₹218.00
(as of Mar 08, 2024 19:46:48 UTC – Details)हाउ टू विन फ्रेण्ड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी हे वक्तृत्वकलेतील आणि व्यक्तिमत्त्वविकासातील एक अग्रगण्य तज्ज्ञ होते. त्यांच्या लिखाणामुळे व शिकवणूकीमुळे जगभरातील लाखो लोकांना आत्मविश्वासपूर्ण, प्रभावी आणि धैर्यशील व्यक्ती होण्यास मदत झाली आहे. वक्तृत्वकलेवरच्या या नेहमीच लोकप्रिय असणाऱ्या बेस्टसेलर पुस्तकामध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे :
१. एखादे भाषण तयार करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या?
२. तुमच्या भाषणाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यावे?
३. श्रोत्यांना तुमच्या संदेशाशी सहमत बनवण्यासाठी कसे उद्युक्त करावे?
४. तुमच्या भाषणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी देहबोलीचा योग्य वापर.
५. तुम्ही स्पष्ट केलेला मुद्दा श्रोत्यांच्या लक्षात राहण्यासाठी आणि त्यावर त्यांच्याकडून अपेक्षित कृती होण्यासाठी तुम्ही तुमचे बोलणे कसे संपवावे किंवा समारोप कसा करावा, या आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी.
२१व्या शतकातील ही सुधारित आवृत्ती आर्थर आर. पेल. (पीएच.डी.) यांनी साकारली आहे. हे पुस्तक सुरुवातीला लिहिले गेले तेव्हापासूनचे बदल आणि सुधारणा यात केल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आजच्या वाचकांना माहीत असलेल्या समकालीन उदाहरणांचाही यात समावेश आहे. अनेक प्रसिद्ध (…आणि जरा कमी प्रसिद्ध) अशा वक्त्यांनी आपली भाषणे कशी वक्तृत्वपूर्ण बनवली त्याची अनेक उदाहरणेही या पुस्तकात समाविष्ट आहेत.
प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सारांश; तसेच भाषणाची योग्य मांडणी, भाषणाचे तंत्र, आवाजासाठी काही सरावपद्धती इत्यादींचा वापर करत टप्प्या-टप्प्याने आणि सहज अंगीकारता येतील अशा प्रात्यक्षिकांवर भर देणारे मार्गदर्शन या पुस्तकातून लाभते.
डेल कार्नेगी यांच्या पुस्तकांचा ३६ पेक्षाही जास्त भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे आणि आजपर्यंत त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रतींची विक्रमी विक्री झाल्याची नोंदही आहे.

From the Publisher

Prabhavi Vakta, Prabhavi Vyakti: Public Speaking For Success by Dale Carnegie

Prabhavi Vakta, Prabhavi Vyakti: Public Speaking For SuccessPrabhavi Vakta, Prabhavi Vyakti: Public Speaking For Success

Book Review

यशस्वी वक्ता होण्यासाठीची विस्तृत रूपरेषा या पुस्तकरूपाने तुम्हाला देण्यात येत आहे; परंतु लक्षात असू द्या की, ही मात्र रूपरेषाच आहे. तुम्ही येथे वाचलेली माहिती कशा प्रकारे प्रत्यक्षात उपयोगात आणता, त्यावरच त्याचे यश अवलंबून आहे.

श्रोत्यांचा सामना करताना जेव्हा या पुस्तकात दिलेल्या तंत्राचा वापर कराल तेव्हा श्रोत्यांचा समूह छोटा असो वा मोठा, अगदी सहजपणे आणि अत्यंत आत्मविश्वासपूर्वक तुम्ही तुमचे विचार मांडू शकाल. तुमच्यासाठी तो एक अत्यंत समाधानाचा आणि फलदायी असा अनुभव असेल.

– आर्थर आर. पेल, पीएच.डी

श्रोत्यांमध्ये बसलेल्या अवस्थेत जसे तुम्ही विचार करू शकता तसे श्रोत्यांसमोर सरळ उभे राहिल्यावर विचार करू शकत नाही, असे का होते याविषयी काही अंधुकशी कल्पना आपल्याकडे आहे काय? याला काही कारण आहे का, की तुम्ही जेव्हा श्रोत्यांसमोर भाषण करायला उभे राहता तेव्हा तुमच्या पोटात गोळा उठतो आणि तुमचे पाय लटपटायला लागतात? निश्चितच, या परिस्थितीत सुधारणा घडवून आणता येऊ शकते, हे तुम्ही जाणता. योग्य प्रशिक्षण आणि सतत केलेल्या सरावाने तुमचे श्रोत्यांबाबतचे भय कमी होऊन तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. या पुस्तकामधून, भाषण तयार करणे आणि प्रत्यक्षात भाषण देणे, याबाबतचे महत्त्वाचे घटक तुम्ही शिकू शकता.

याचबरोबर, तुम्हाला अशी उपयुक्त माहिती देण्यात येईल की, जेणेकरून तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते पाठांतर न करतासुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवता येईल. व्यासपीठावर चांगल्या प्रकारे आपल्या अस्तित्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवता येईल. तुमची भाषाशैली आणि व्याकरण कशाप्रकारे सुधारता येईल याचे मार्गदर्शन आणि डझनावारी प्रसिद्ध वक्त्यांची उदाहरणे येथे दिली आहेत. त्यांनी त्यांची भाषणे कशा प्रकारे असामान्य बनवली याची माहितीदेखील देण्यात आली आहे.

‘हाउ टू विन फ्रेण्ड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी हे वक्तृत्वकलेतील आणि व्यक्तिमत्त्वविकासातील एक अग्रगण्य तज्ज्ञ होते. त्यांच्या लिखाणामुळे व शिकवणुकीमुळे जगभरातील लाखो लोकांना आत्मविश्वासपूर्ण, प्रभावी आणि धैर्यशील व्यक्ती होण्यास मदत झाली आहे. वक्तृत्वकलेवरच्या या नेहमीच लोकप्रिय असणाऱ्या बेस्टसेलर पुस्तकामध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे :

१. एखादे भाषण तयार करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी अत्यावश्यक

असलेल्या गोष्टी कोणत्या?

२. तुमच्या भाषणाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यावे?

३. श्रोत्यांना तुमच्या संदेशाशी सहमत बनवण्यासाठी कसे उद्युक्त करावे?

४. तुमच्या भाषणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी देहबोलीचा योग्य वापर.

५. तुम्ही स्पष्ट केलेला मुद्दा श्रोत्यांच्या लक्षात राहण्यासाठी आणि त्यावर त्यांच्याकडून अपेक्षित कृती होण्यासाठी तुम्ही तुमचे बोलणे कसे संपवावे किंवा

समारोप कसा करावा, या आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी..

२१व्या शतकातील ही सुधारित आवृत्ती आर्थर आर. पेल. (पीएच.डी.) यांनी साकारली आहे. हे पुस्तक सुरुवातीला लिहिले गेले तेव्हापासूनचे बदल आणि सुधारणा यात केल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आजच्या वाचकांना माहीत असलेल्या समकालीन उदाहरणांचाही यात समावेश आहे. अनेक प्रसिद्ध (…आणि जरा कमी प्रसिद्ध) अशा वक्त्यांनी आपली भाषणे कशी वक्तृत्वपूर्ण बनवली त्याची अनेक उदाहरणेही या पुस्तकात समाविष्ट आहेत.

प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सारांश; तसेच भाषणाची योग्य मांडणी, भाषणाचे तंत्र, आवाजासाठी काही सरावपद्धती इत्यादींचा वापर करत टप्प्या-टप्प्याने आणि सहज अंगीकारता येतील अशा प्रात्यक्षिकांवर भर देणारे मार्गदर्शन या पुस्तकातून लाभते.

डेल कार्नेगी यांच्या पुस्तकांचा ३६ पेक्षाही जास्त भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे आणि आजपर्यंत त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रतींची विक्रमी विक्री झाल्याची नोंदही आहे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2014); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 356 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177869671
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177869675
Item Weight ‏ : ‎ 280 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Scroll to Top