One Page Story : वन पेज स्टोरी पुस्तक, Marathi Short Story Books, Fiction Book, Kath Sangrah, मराठी पुस्तके, KathSangrah, Laghukatha, Dr Vikram Lokhande

One Page Story : वन पेज स्टोरी पुस्तक, Marathi Short Story Books, Fiction Book, Kath Sangrah, मराठी पुस्तके, KathSangrah, Laghukatha, Dr Vikram Lokhande


Price: ₹129.00
(as of Apr 06, 2024 14:22:42 UTC – Details)



“डॉ. विक्रम लोखंडे यांच्या ‘वन पेज स्टोरी’ या कथासंग्रहाचे स्वागत करताना मला मन:पूर्वक आनंद होत आहे. या संग्रहातल्या बऱ्याच कथा नात्याशी सबधित आहेत. नाती. त्यातन निर्माण होणाऱ्या अपेक्षा. अपेक्षाभंग, फसवणूक अनेक कथांमधून दिसून येते. खरंतर या सगळ्यात लेखकाला कशाचं महत्त्व वाटतं, लेखक कशाचं कौतुक करतो यावर कथांचं मोठेपण ठरतं. या संग्रहातील अनेक कथामधून लेखकान माणसाच्या उदार वृत्तीचं दर्शन घडवलं आहे.
‘वन पेज स्टोरी’चा फॉर्म हा चतुराईची मागणी करणारा आहे. लेखक आपल्याला हात धरून एका दिशेने घेऊन जातो आणि पोहोचल्यावर आपण भलतीकडेच आलो असं वाचकाच्या लक्षात येतं. परंतु फसवणूक सुद्धा आनंददायक आहे असं वाटायला लावणाऱ्या काही कथा या संग्रहात आहेत.”
– प्रा. अजित दळवी

“आपण डॉक्टरला आपल्यासारखी तीही माणसंच आहेत अस समजत नाही. खूपदा शस्त्रक्रियेमुळे तर त्यांना भावना आहेत असंही आपल्याला वाटत नाही. वर्दीत पद पाहतो आपण, माणूस बघत नाही किंवा तशी वेळही खूपदा येत नाही. पण काही भन्नाट गोष्टी घडतात आणि वर्दीतल्या माणसांची ओळख होते.
डॉ. विक्रम लोखंडे यांचं ‘वन पेज स्टोरी’ हे पुस्तक म्हणजे असाच भन्नाट कथासंग्रह. भरमसाट पानं सांगू शकत नाहीत एवढं ‘वन पेज स्टोरी’ एका पानात सांगून जातात. एरव्ही आपल्याला डॉक्टरला भेटून बरं वाटतं, पण या डॉक्टरला वाचूनही बरं वाटेल याची खात्री आहे.”
– अरविंद जगताप

From the Publisher

One Page Story

One Page StoryOne Page Story

“डॉ. विक्रम लोखंडे यांच्या ‘वन पेज स्टोरी’ या कथासंग्रहाचे स्वागत करताना मला मन:पूर्वक आनंद होत आहे. या संग्रहातल्या बऱ्याच कथा नात्याशी सबधित आहेत. नाती. त्यातन निर्माण होणाऱ्या अपेक्षा. अपेक्षाभंग, फसवणूक अनेक कथांमधून दिसून येते. खरंतर या सगळ्यात लेखकाला कशाचं महत्त्व वाटतं, लेखक कशाचं कौतुक करतो यावर कथांचं मोठेपण ठरतं. या संग्रहातील अनेक कथामधून लेखकान माणसाच्या उदार वृत्तीचं दर्शन घडवलं आहे.

‘वन पेज स्टोरी’चा फॉर्म हा चतुराईची मागणी करणारा आहे. लेखक आपल्याला हात धरून एका दिशेने घेऊन जातो आणि पोहोचल्यावर आपण भलतीकडेच आलो असं वाचकाच्या लक्षात येतं. परंतु फसवणूक सुद्धा आनंददायक आहे असं वाटायला लावणाऱ्या काही कथा या संग्रहात आहेत.”

– प्रा. अजित दळवी

“आपण डॉक्टरला आपल्यासारखी तीही माणसंच आहेत अस समजत नाही. खूपदा शस्त्रक्रियेमुळे तर त्यांना भावना आहेत असंही आपल्याला वाटत नाही. वर्दीत पद पाहतो आपण, माणूस बघत नाही किंवा तशी वेळही खूपदा येत नाही. पण काही भन्नाट गोष्टी घडतात आणि वर्दीतल्या माणसांची ओळख होते.

डॉ. विक्रम लोखंडे यांचं ‘वन पेज स्टोरी’ हे पुस्तक म्हणजे असाच भन्नाट कथासंग्रह. भरमसाट पानं सांगू शकत नाहीत एवढं ‘वन पेज स्टोरी’ एका पानात सांगून जातात. एरव्ही आपल्याला डॉक्टरला भेटून बरं वाटतं, पण या डॉक्टरला वाचूनही बरं वाटेल याची खात्री आहे.”

– अरविंद जगताप”

One Page StoryOne Page Story

सगळेजण म्हणतात, ‘नवीन पिढी खूप फास्ट आहे. त्यांना संयम नाही, लांबलचक लेख वाचायला त्यांना आवडत नाही, जास्त वेळ ते एकाग्र राहू शकत नाही, त्यांना सगळं काही पटकन आणि थोडक्यात हवं असतं’. पण मी असं म्हणेन की, ‘नवीन पिढीची आकलन क्षमता खूप जास्त आहे. नेमकं सांगितलेलं त्यांना पटकन समजतं. त्यांना ते आवडतंही.’

‘वन पेज स्टोरी’ वाचताना खूप एकाग्र होऊन शांतपणे वाचावी लागते. प्रत्येक वाक्य तुम्हाला कथेच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जातं अन् कित्येक न लिहिलेली वाक्यं आणि भावना उमगतात. त्यामुळे माझी वाचकांना ही विनंती आहे की, एक कथा वाचल्यानंतर त्या कथेमध्ये थोडंसं रममाण व्हा. कथेचा न लिहिलेला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा अनुभव घ्या अन् मगच पुढची कथा वाचा.

‘गेम ऑफ थ्रोन्स’् या वेबसिरीजमध्ये एका अभिनेत्याच्या तोंडी डायलॉग आहे, ‘‘सगळ्यांना एकत्र करण्याची ताकद कुणामध्ये आहे? ना ती पैशात आहे, ना सोन्या-नाण्यामध्ये आहे; ना सत्तेत आहे. तर ती ताकद फक्त ‘स्टोरी’मध्ये असते. स्टोरीपेक्षा दुसरं काहीच पॉवरफुल नाही…!’’ यापुढे मी म्हणेन की, ‘‘प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे ‘स्टोरीज्’च असतात.’’ ह्याच कथा भविष्यात येणार्‍या पिढ्या आठवत असतात. त्यांना त्यातून शिकायला मिळतं, आदर्श मिळतो.

खरंतर या गोष्टी लिहिताना काल्पनिकरीत्या का होईना आपण दुसर्‍यांच्या ‘स्टोरीज’ जगत असतो. वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्याचा रंगमंच, त्यांच्या भावनांची घालमेल, त्यांचे स्वभाव आपल्याला समजून घेता येतात, अनुभवता येतात.

त्यामुळे लिहिणं ही मला सर्वोत्तम क्रिएटिव्हिटी वाटते… यात तुम्ही न जगलेली खूप सारी आयुष्यं जगता येतात.

– डॉ. विक्रम लोखंडे

One Page StoryOne Page Story

तुम्हाला ऑपरेशन करावं लागू शकतं असं डॉक्टरांनी म्हटल्यावर तिची झालेली घालमेल डॉक्टरांनी स्पष्ट टिपली होती. मागच्या खुर्चीवर बसलेल्या तिच्या मुलाकडे तिनं कावर्‍याबावर्‍या नजरेनं पाहिल्यावर मुलानं तेवढ्याच निस्सीम प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या आश्वासक अशा नजरेनं तिला दिलासा दिला. हे पाहून डॉक्टरांना हायसं वाटलं.

‘‘किती मुलं आहेत तुम्हाला?’’ डॉक्टरांनी विचारलं.

‘‘दोन – हा मोठा मुलगा आणि एक लहान मुलगी!’’ ती म्हणाली.

‘‘आधी कुठलं ऑपरेशन झालं आहे का?’’ डॉक्टरांनी विचारलं.

‘‘मोठं ऑपरेशन नाही; पण कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन झालंय.’’ तिनं उत्तर दिलं. असेच 2-4 प्रश्न विचारल्यावर डॉक्टर थोडेसे थांबले. तेव्हा तिनं घाबरत विचारलं,

‘‘पण ही गाठ कॅन्सरची तर नाही ना?’’

तिनं असं विचारल्यावर तिचा मुलगा मागच्या खुर्चीवरून उठून तिच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवले. तिला आधार दिला.

डॉक्टर म्हणाले, ‘‘तशी कॅन्सरची खूपच कमी शक्यता आहे तुम्हाला. मूलबाळ नसलेल्या पेशंटमध्ये थोडीफार शक्यता जास्त असते तशी; पण तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही.’’ थोडा वेळ कुणीच बोललं नाही.

मग ती म्हणाली,

‘‘डॉक्टर! काही लपवायला नको म्हणून सांगते. 25 वर्षांत कुणाला तरी पहिल्यांदाच सांगतेय हे. मी यांची सख्खी आई नाही. यांची पहिली आई अचानक गेली. यांच्या वडिलांनी माझ्याशी लग्न केलं त्यावेळेस या दोन मुलांच्या संगोपनात काही उणीव, उपरेपणा, दुजाभाव निर्माण होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि मी कुटुंबनियोजनचं ऑपरेशन केलं; पण दुर्दैवानं दोन वर्षांत ते वारले आणि डोंगराएवढी संकटं पेलत यांना मी एकटीनंच सांभाळलं 25 वर्षं!’’

तिच्या या अनपेक्षित उत्तरानं डॉक्टर हरखले आणि त्यांनी तिच्या मुलाकडे पाहिलं. तिच्या संगोपनात काहीच उणीव, उपरेपणा आणि दुजाभाव नव्हता हे त्यानं नजरेनंच डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर भारावून गेले अन् त्यांनी विचार केला –

‘‘देव असंपण करतो का? इथल्या इथेच फिटट्मफाट…!!’’

One Page StoryOne Page Story

‘‘बोला डॉक्टर, बोला, ऐकतेय मी,’’ ती खंबीरपणे म्हणाली.

‘‘तुम्ही यांची मुलगी ना…? अतिशय गंभीर प्रकृती आहे तुमच्या वडिलांची. काहीच आशा नाहीत. आम्ही खूप प्रयत्न केलेत; पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात!’’

ती शांतपणे ऐकत होती. तिनेच वडिलांना हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तेव्हापासून ती एकटीच सगळं सांभाळत होती – अतिशय धीरगंभीरपणे. औषधी आणणं असो, डॉक्टरांशी संवाद असो, की पेशंटची काळजी घेणं… ती काटेकोरपणे सर्व जबाबदार्‍या पार पाडत होती. कधीच ती हताश, खचलेली दिसली नाही.

डॉक्टर म्हणाले, ‘‘काही औपचारिक बाबींची पूर्तता करायची आहे, तोपर्यंत तुम्हाला कुणी पुरुष मंडळी बोलवता येईल का…?’’

‘‘मी आहे डॉक्टर… मलाच सांगा,’’ ती म्हणाली.

‘‘नाही तुम्ही एकट्याच दिसता. अजून कुणी असेल तर बोलवा…!’’ डॉक्टर म्हणाले.

‘‘नाही डॉक्टर… मला सांगा काय ते…!’’ खंबीरपणे ती म्हणाली.

‘‘तुमच्या वडिलांना नाही वाचवू शकलो. आम्ही पूर्ण प्रयत्न केलेत डॉक्टर म्हणाले.’’ ती तशीच उभी होती. थोडीशी गांगरली; पण स्वत:ला सावरत म्हणाली, ‘‘ठीक आहे डॉक्टर. तुम्ही फॉर्मॅलिटीज करा. डेथ सर्टिफिकेट तयार करा. मी तोपर्यंत बाकीची मंडळी बोलावते.’’

थोड्या वेळाने फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. डेड बॉडीजवळ ती उभी होती. डॉक्टर तिच्या धैर्याकडे कौतुकाने बघत होते. जाताना ती डॉक्टरांना म्हणाली, ‘‘थँक्यू डॉक्टर. तुम्ही खूप प्रयत्न केलेत. मी तुमची आभारी आहे.’’

डॉक्टर म्हणाले, ‘‘आम्हालाही तुमचे धैर्य बघून खूपच कौतुक वाटले. तुमच्या धैर्याला सलाम.’’

ती म्हणाली, ‘‘आधी आई गेली तेव्हा खूप रडले. मग माझे पती गेले, तेव्हा सगळी आसवं संपून गेली. वडिलांनी शिकवले होते अनपेक्षित, दुर्दैवी धक्क्यांना पचवायला. त्यामुळे वडिलांच्या पार्थिवाजवळ जर रडत बसले तर वाईट वाटेल त्यांना. ते म्हणतील, शेवटी रडलीसच ना. तुझी एवढी तयारी करून घेतली, काय उपयोग झाला त्याचा. आता तर खरी सुरुवात होतेय संघर्षाला. रडून कसं चालेल…?’’

Dr. Vikram LokhandeDr. Vikram Lokhande

डॉ. विक्रम लोखंडे

डॉ. विक्रम लोखंडे हे विख्यात गायनॅकॉलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 15,000 गायनॅकॉलॉजिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तसंच वेगवेगळ्या 300 हॉस्पिटल्समध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून काम केलेलं आहे.

त्यांचं शालेय शिक्षण हे शासकीय विद्यानिकेतन, औरंगाबाद येथे झालेलं असून एमबीबीएस पदवी एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, औरंगाबाद येथून पूर्ण केली आहे. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे येथे घेतलं आहे. बर्‍याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय

लॅप्रोस्कोपी कॉन्फरन्समध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे.

ते नारायणी हॉस्पिटल (3 लॅप्रोस्कोपी, फर्टिलिटी क्लिनिक अ‍ॅण्ड मॅटर्निटी होम), औरंगाबाद या संस्थेचे संचालक आहेत. ते एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, औरंगाबाद येथे सहयोगी प्राध्यापक असून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

लॅप्रोस्कोपी फेलोशिप प्रोग्रामच्या माध्यमातून नारायणी हॉस्पिटल या संस्थेत अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ लॅप्रोस्कोपी ऑपरेशन शिकण्यासाठी येतात.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (16 October 2022); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 128 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203682
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203680
Item Weight ‏ : ‎ 150 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Scroll to Top