Navi Manasa : Katha Sangrah Book in Marathi, Narayan Dharap Books, Kathasangrah मराठी पुस्तके, कथासंग्रह पुस्तक, नारायण धारप बुक्स, Horror


Price: ₹99.00
(as of Apr 27, 2024 11:21:49 UTC – Details)



नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.
नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.
‘440, चंदनवाडी’ ही धारपांच्या गाजलेल्या भयचकित कादंबर्यांपैकीच एक. या कादंबरीत शुभ आणि अशुभ यांचा संघर्ष आहे. एक अति प्राचीन अघोरी शक्ती आणि क्षणमात्र श्वास रोखून धरणारे प्रसंग हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य. या शक्तीच्या विरोधात अनेक तंत्रशक्ती, मानसशक्ती, धर्मशक्ती उभ्या आहेत. धारपांच्या भयकथांचे खास वैशिष्ट्य येथेही पहावयास मिळते. कथा पूर्ण वाचून झाल्यावर वाचकाच्या शूचितेवरचा, मांगल्यावरचा, मानवाच्या मानवतेवरचा विश्वास अधिकच दृढ होतो.
या कादंबरीतील सर्व घटना वाचकांची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचवितात. यातील गूढ आणि रहस्यमय घटना वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

From the Publisher

Navi Manasa by Narayan Dharap

Navi ManasaNavi Manasa

अंधारात तो प्रकाशबिंदू चमकत होता. अगदी स्थिर होता. अगदी शंभर-सव्वाशे फुटांवर असल्यासारखा. बाकी सर्वत्र शांतता होती. नाही म्हणायला मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक झाडांतून विव्हळत जात होती. मनातली शंका प्रयासानं दूर लोटली आणि मी पुढे निघालो. प्रकाश खरोखरच शंभर फुटांवरून होता.

जंगलातली माझी वाट मला एका खळखळणाऱ्या नाल्यापाशी घेऊन आली होती. नुकत्याच झालेल्या पावसाने नाला दुथडी भरून वाहत होता. पाणी फेसाळत होतं, तुषार चंद्रप्रकाशात चमकत होते. नाल्यावर एका कमानीचा दगडी पूल होता. पलीकडे ते घर होतं. ते चित्र माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे.

पुलावरून जाणारी पायवाट अंगणात शिरली होती. अंगण मोठं होतं, स्वच्छ होतं. मजला एकच; पण उंची खूप. पांढऱ्याशुभ्र भिंती, उतरतं छप्पर. मागच्या बाजूस वाऱ्यावर हलणाऱ्या पाच-सहा नारळी. आणखी एक-दोन बसकी झाडं.

चंद्रप्रकाश त्या घरावरून ओघळत होता. मागच्या गडद पार्श्वभूमीवर घर उजळून निघालं होतं. नारळीशिवाय इतर काही हालचाल नव्हती. ओसरीच्या एका खांबाला कंदील टांगलेला होता. मी त्या दृश्याकडे किती वेळ पाहत राहिलो मला माहीत नाही.

– प्रस्तुत कथासंग्रहातून

———————————————————————————–

नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.

नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. ‘माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. ।

धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Narayan Dharap Narayan Dharap

Narayan Dharap

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.1 out of 5 stars
76

4.0 out of 5 stars
62

4.3 out of 5 stars
267

3.9 out of 5 stars
57

3.6 out of 5 stars
71

4.3 out of 5 stars
127

Price

₹160.00₹160.00 ₹130.00₹130.00 ₹105.00₹105.00 ₹94.00₹94.00 ₹160.00₹160.00 ₹120.00₹120.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Third edition (1 January 2018); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 96 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177868241
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177868241
Item Weight ‏ : ‎ 120 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Scroll to Top