Mossad: Israeli Most Secret Service Book Marathi, मोसाद मराठी अनुवादीत बुक्स, Novel Books in, इस्रायलची बुक, मोसाड पुस्तक, इस्राएलच्या पुस्तके, Israel Chi Musad, Israelchi Moosad, Istrailacha Mosad

Price: ₹256.00
(as of Mar 15, 2024 00:44:39 UTC – Details)उत्कृष्टपणे सांगितलेले कथानक’
– डेली एक्स्प्रेस, लंडन

जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या मोसादइतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने ‘जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था’ असे मोसादबद्दल उद्गार काढलेले आहेत. मोसादचे नाव निघाले की, इस्रायलचे मित्र आदराने बघतात तर शत्रूच्या मनात भय उत्पन्न होते. खरंतर १९४०मधील इस्रायलच्या निर्मितीपासून, मोसाद हे त्यांच्या जगण्याच्या सततच्या संघर्षातले महत्त्वाचे शस्त्र आहे.
मोसादने घडवून आणलेल्या एंटेबे विमानतळावरील धडक कारवाईमध्ये केलेली इस्रायली ओलिसांची नेत्रदीपक सुटका आजसुद्धा गुप्तहेरांच्या जगात एक चमत्कार समजली जाते. तसेच इराकची अणुभट्टी नष्ट करण्यासाठी ज्याप्रकारे मोसाद एजंट्सनी इस्रायली वायुसेनेला बॉम्बरचे लक्ष्य निश्चित करून दिले होते, ती कामगिरीदेखील उल्लेखनीय आहे.
हे पुस्तक म्हणजे मोसादचा पहिला संपूर्ण इतिहास होय. अंगावर शहारे आणणाऱ्या एखाद्या थ्रिलरसारखा हा इतिहास वाटतो; परंतु त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. अतिशय तटस्थ राहून मोसादमधील ऐतिहासिक घटनांच्या कारणांची आणि परिणामांची मीमांसा करण्यात लेखक यशस्वी ठरतात. आणि हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या नवनिर्मित देशासाठी प्राणालाही तुच्छ लेखणाऱ्या मोसाद एजंट्सच्या विविध कारवाया आणि दहशतवादविरोधी तंत्रं यांच्या अविश्वसनीय कथा या पुस्तकात आहेत. गुप्तहेरांचे आयुष्य कितीही कठीण असले तरी त्यांची देशभक्ती किती प्रखर असू शकते हे या कथा सांगतात.

From the Publisher

Mossad: Israeli Most Secret Service Book Marathi

MossadMossad

‘उत्कृष्टपणे सांगितलेले कथानक’

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाचकांच्या प्रतिक्रिया

“मी मोसाद आणि इस्रायलकरिता काम करणारा एक वकील आहे. मी ज्यू नाही. तरीही मला वाटते की चहूबाजूंनी अरब देशांनी वेढलेल्या इस्रायलने खूपदा विचित्र परिस्थितीतून मार्ग काढलेला आहे. या पुस्तकात केले गेलेले प्रत्येक घटनेचे तटस्थ विश्लेषण खूप आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.””

– जेम्स होड्स

“हे पुस्तक दहशतवादाने गांजलेल्या आजच्या जगासाठी उपयुक्त आहे. या पुस्तकासाठी लेखकाने घेतलेले परिश्रम आणि शोधकार्य वाखाणण्याजोगे आहे. जग ज्या गुप्तचर यंत्रणेला घाबरते त्या यंत्रणेला समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय.””

– सांबसिवन

“१९८० पर्यंतच्या मोसादच्या कारकीर्दीचं वर्णन करणारं अतिशय समतोल आणि अनाग्रही पुस्तक. कोणत्याही राजकीय वा आदर्शवादी प्रतिक्रियांना बळी न पडता लेखकाने इस्रायल किंवा पॅलेस्टाईन, कोणत्याच देशासंबंधाने मत व्यक्त केलेले नाही। आणि तरीही इस्रायलच्या महत्त्वाच्या गुप्तहेर यंत्रणेचा इतिहास पूर्णपणे मांडला आहे.

– डी कम्बोज

‘उत्कृष्टपणे सांगितलेले कथानक’

– डेली एक्स्प्रेस, लंडन

MossadMossad

जगभरातील सर्व गुप्तहेर यंत्रणांपैकी मोसाद ही सर्वाधिक षड्यंत्रकारी संस्था आहे. तिचे संपूर्ण नावच – द इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अ‍ॅण्ड स्पेशल सर्व्हिसेस (गुप्तचर आणि विशेष सेवा संस्था) – तिचे वैशिष्ट्य अधोरेखित करते.

जगभरातील अशा संस्थांपैकी प्रमुख असलेली सीआयए ही ‘एजन्सी’ आहे आणि स्वत:ला ‘कंपनी’ म्हणवून घेते; ब्रिटिश एसआयएस ही ‘सेवा’ आहे आणि स्वत:ला ‘फर्म’ म्हणवून घेते. मोसाद ही मात्र विशिष्ट सेवांच्या विनाशक शक्तींचा आधार असलेली एक शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्था आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कणखरपणे डावपेच आखणारी ही सर्वोत्तम संस्था आहे.

शक्तिशाली शत्रू राष्ट्रांच्या सीमा चहूबाजूंनी वेढलेल्या असूनही खंबीरपणे उभ्या असलेल्या देशासाठी, अर्थात इस्रायलसाठी मोसाद कार्यरत आहे कारण तिथे प्रत्येक नागरिक सततच्या युद्धभयाखाली जगतो आहे. आणि ही गोष्टच, मोसादला इतर सर्व प्रमुख हेरगिरी यंत्रणांपेक्षा एकमेवाद्वितीय ठरवते. विवादित सीमारेषा असलेल्या इस्रायलच्या अंतर्गत अरबबहुल प्रदेशांमध्ये आता नेहमी उठाव होऊ लागले आहेत आणि एखाद्या युरोपियन राष्ट्रामध्ये असावे तसे ‘सामान्य’ जीवन तिथे उरलेले नाही. याव्यतिरिक्त, या नवीन देशातील प्रत्येक कुटुंबात होलोकास्टमध्ये (यहुदी लोकांचा वांशिक नरसंहार) बळी गेलेल्या 60 लाख ज्यू लोकांची आठवण आजही ताजी आहे. ‘मुक्या मेंढरांचे हत्यासत्र’ अशा शब्दांत आजच्या तरुण पिढीला या घटनेची आठवण करून दिली जाते. या सेवायंत्रणेतील नवीन उमेदवारापासून अनुभवी प्रौढांपर्यंत प्रत्येकजण यहुदी (ज्यू) असल्याचा जाज्वल्य अभिमान आणि देशाच्या अखंड संरक्षणाची तीव्र इच्छाशक्ती बाळगून असतो. याच कारणास्तव सीआयए, केजीबी किंवा एमआय6 या इतर राष्ट्रांच्या गुप्तचर संघटनांमधील बरोबरीच्या देशभक्त सहकार्‍यांपेक्षा, इस्रायली गुप्तचर संघटनेमधील एजंट्स राष्ट्राप्रति सर्वाधिक समर्पित आहेत. जगातील अन्य मोठ्या शक्तिशाली देशांपेक्षा इस्रायलसमोर असलेले परकीय आक्रमणाचे भय अधिक उघड आणि तीव्र आहे. 1953 मध्ये त्या वेळी कार्यरत असलेल्या इस्रायली गुप्तचर प्रमुखांनी या सेवायंत्रणेमागील उद्देश स्पष्ट करण्यासाठी एक आदेश काढला होता; ‘आपले राष्ट्र, जे त्याच्या निर्मितीपासूनच, शत्रूच्या गुप्तचर यंत्रणांच्या वेढ्यात आहे, त्याच्या बचावासाठीची ही पहिली पायरी आहे. मध्य पूर्वेच्या सर्व उलथापालथी आणि धक्क्यांच्या मध्यस्थानी असलेल्या आम्ही, आमच्या सभोवताली काय घडत आहे याची उत्तमप्रकारे जाण ठेवली पाहिजे.’

गुप्ततेच्या या जगात, जिथे गुप्तचर यंत्रणांचा उदय आणि अस्त याबद्दल अनेक कथा प्रचलित असतात तिथे मोसाद आणि अमान या लष्करी गुप्तचर यंत्रणा मात्र, त्यांची एकनिष्ठता व कार्यक्षमता यासाठी आदरास पात्र ठरल्या आहेत. सीआयएने एका अहवालात त्यांच्याबद्दल ‘जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा’ हे गौरवोद्गार काढले आहेत. या यंत्रणांच्या अनेक मित्रपक्षांना त्यांच्या कारवाया नेहमीच प्रशंसनीय वाटतात. मोसादच्या नावाभोवती पसरलेल्या या यशोवलयाचा शत्रूंनी मोठा धसका घेतला होता.

निर्मितीपासून आजतागायत सतत युद्धाच्या तणावाखाली जगणारे हे राष्ट्र आणि कट्टर देशाभिमानी असलेल्या त्याच्या गुप्तहेरांच्या कारवायांचा इतिहास ‘मोसाद’च्या रूपाने वाचून अंगावर काटे उभे राहतात.

Ronald PayneRonald Payne

रोनाल्ड स्टेव्हली पायने

(६ फेब्रुवारी १९२६ – २५ मे २०१३)

रोनाल्ड पायने हे हेरगिरी आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारे प्रतिष्ठित ब्रिटिश वृत्तपत्र वार्ताहर होते. त्यांनी १९५०च्या दशकात पूर्वेतील देशांवर लेख लिहिण्यास सुरुवात केली. कर्नल गद्दाफी यांची त्यांनी घेतलेली मुलाखतही चांगलीच गाजली. दहशतवाद आणि युद्धावर त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके सुप्रसिद्ध आहेत.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (16 October 2022); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 296 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203690
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203697
Item Weight ‏ : ‎ 340 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Scroll to Top