Chetkin : Kadambari Book in Marathi, Narayan Dharap Marathi Books, Novels मराठी पुस्तके, कादंबरी पुस्तक, नारायण धारप मराठी बुक्स, Horror

Chetkin : Kadambari Book in Marathi, Narayan Dharap Marathi Books, Novels मराठी पुस्तके, कादंबरी पुस्तक, नारायण धारप मराठी बुक्स, Horror


Price: ₹189.00
(as of Mar 13, 2024 11:28:39 UTC – Details)



चेटकीण’ ही कादंबरीविविध प्रकारच्या गूढतेने खच्चून भरलेली आहे. या कादंबरीतील अनेक प्रसंग आपल्या वास्तविक जीवनात घडल्याचे आपण ऐकलेले असते; पण बघितलेले किंवा अनुभवलेले नसते. नेमकी हीच प्रचीती या पुस्तकातून येते. या कादंबरीला आभासी विश्वाची एक मुक्त सफरच म्हणावी लागेल.
गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. त्या वास्तूत अनाकलनीय घटना घडतात. या सर्व घटना मानवाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्याबाहेरच्या आहेत. या वास्तूत एक एक व्यक्ती त्या अनाकलनीय शक्तीला कशी सामोरी जाते आणि कशी गडप होत जाते; पुढे असे घडणार आहे असे माहीत असूनसुद्धा! तर काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि ती वास्तू पवित्र होते, पिशाच्च मुक्त होते.

From the Publisher

Chetkin by Narayan Dharap

ChetkinChetkin

‘चेटकीण’ ही कादंबरीविविध प्रकारच्या गूढतेने खच्चून भरलेली आहे. या कादंबरीतील अनेक प्रसंग आपल्या वास्तविक जीवनात घडल्याचे आपण ऐकलेले असते; पण बघितलेले किंवा अनुभवलेले नसते. नेमकी हीच प्रचीती या पुस्तकातून येते. या कादंबरीला आभासी विश्वाची एक मुक्त सफरच म्हणावी लागेल.

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. त्या वास्तूत अनाकलनीय घटना घडतात. या सर्व घटना मानवाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्याबाहेरच्या आहेत. या वास्तूत एक एक व्यक्ती त्या अनाकलनीय शक्तीला कशी सामोरी जाते आणि कशी गडप होत जाते; पुढे असे घडणार आहे असे माहीत असूनसुद्धा! तर काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि ती वास्तू पवित्र होते, पिशाच्च मुक्त होते.

———————————————————————————–

नारायण धारप यांनी गेल्या शतकातील साठच्या दशकात लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर शेवटपर्यंत ते निरंतर लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची भरभराट नव्हती, तेव्हा सामान्य वाचक अतिशय उत्कंठित होऊन त्यांच्या लेखनाची प्रतीक्षा करीत होता.

नारायण धारप यांच्या कथानकाचा विषय हा ‘भय’ या विकाराशी बांधील आहे. कथानकात पुढे काय घडणार आहे याची उत्कंठा कायम ठेवून वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवतात, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या पाशात व्यक्ती कशा येतात, शारीरिक व मानसिक वेदना कशा भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने ती कशी सुटतात आणि कशी बळी पडतात याचं अतिशय विलक्षणरीत्या वर्णन येते.

चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित, गूढतेने; पण भयपटाला शोभावी अशी ही कादंबरी वाचकांना एका जागेवरच खिळवून ठेवण्यात यशस्वी होते, हे वेगळे सांगायला नको!

Narayan DharapNarayan Dharap

Narayan Dharap

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Fifth edition (1 January 2018); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 208 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177869388
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177869385
Item Weight ‏ : ‎ 230 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Scroll to Top